आज महाविद्यालयात सांकृतिक कार्यक्रम समितीच्या वतीने जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महिलांच्या नेतृत्वाची, कर्तृत्वाची, मातृत्वाची आणि दातृत्वाची दखल घेत त्यांचा सक्रीय सहभाग नोंदवला जावा यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थीनीनी मोठ्या संख्येने यात भाग घेतला. प्रा. लक्ष्मीकांत कापगते यांच्या संकल्पनेतून आणि मा. डॉ. ईश्वर मोहुर्ले यांच्या मार्गदर्शनातून महिला सक्षमकारणाचा नारा देण्यात आला. या प्रसंगी महिला तक्रार निवारण समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थीत होते.