Shri Durga Shikshan Sanstha's

SHIVPRASAD SADANAND JAISWAL COLLEGE

ARTS, COMMERCE & SCIENCE

ARJUNI - MORGAON, DISTRICT - GONDIA, 441701

RE-ACCREDITED WITH 'B' GRADE BY NAAC CGPA 2.11

Permanently Affiliated to Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, Nagpur

SSJ arjuni founder

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती उत्साहात संपन्न

आज दिनांक ३ जानेवारी २०२४ रोज बुधवारला महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती उत्साहात संपन्न झाली. सावित्रीबाई फुले यांच्या कार्याने पारंपारिक लिंग भूमिकांना आव्हान देऊन, शिक्षण आणि स्त्रियांच्या हक्कांच्या महत्त्वावर जोर देऊन, दडपशाहीच्या परस्परविरोधी प्रकारांना संबोधित करून आणि महिला सक्षमीकरण आणि प्रतिकारासाठी एक आदर्श म्हणून काम करून भारतातील स्त्रीवादी चळवळीवर प्रभाव पाडला. तिचा वारसा कार्यकर्त्यांच्या, स्त्रीवादी आणि समाजसुधारकांच्या पिढ्यांना प्रेरणा देत आहे. प्रतिकूल परिस्थितीत तिचे धाडसी प्रयत्न आणि सामाजिक न्यायाप्रती तिची अटळ बांधिलकी यामुळे तिला भारतातील महिला सक्षमीकरणाचे प्रतीक बनले आहे. तिच्या कार्याने देशातील स्त्रीवादी चळवळीचा पाया घातला आणि समानता आणि न्यायासाठी लढणाऱ्यांसाठी प्रेरणास्त्रोत म्हणून काम करत आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. डांगे सर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पी. आर. भानसे यांनी केले. प्रास्ताविकेत त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेल्या कार्याचा प्रामुख्याने उल्लेख केला. प्रभारी प्राचार्य डॉ. डांगे सर यांनी सावित्रीबाई यांनी शुद्राती- शुद्रांसाठी व स्त्रियांसाठी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे आभार प्रा. स्वाती मडावी मॅडम यांनी केले. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर एका सुंदर कवितेचे वाचन केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्य विद्यार्थिनी व विद्यार्थी उपस्थित होते