आज महाविद्यालयात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून “मी सिंधुताई सपकाळ बोलतेय” एकपात्री प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. सौ. विद्याताई सोनुले, सेनि मुख्याध्यापिका सिंदेवाही यांनी “मी सिंधुताई सपकाळ बोलतेय” एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण करताना सिंधुताई सपकाळ यांचे संपूर्ण आयुष्य उभे केले होते. त्यांच्या संवादातून, मन हेलावून टाकणाऱ्या करुआमय अदाकारीतून प्रेक्षकांची माने जिंकली. स्व. सिवाप्रसाद जी जायस्वाल जयंती उत्सवाचे समन्वयक प्रा. लक्ष्मीकांत कापगते यांनी प्रास्ताविकातून आणि निवेदनातून कार्यक्रमाची भूमिका विषद केली. डॉ. ईश्वर मोहुर्ले, प्राचार्य यांची सिंधुताईच्या जीवनाचा आढावा घेत त्यांचे आयुष्य कसे प्रेरणादायी आहे. हे पटवून दिले. या कार्यक्रमास विद्यार्थी आणि विद्याथीनिनी प्रचंड प्रतिसाद दिला.