राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 सप्ताह साजरा:
——————————–
आज महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जाणीव जागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले त्यानिमित्त विविध स्पर्धा व व्याख्यान आयोजित करण्यात आली. ” राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020: शालेय व उच्च शिक्षण” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आणि वक्ते म्हणून डॉ देवदत्त तारे, पदव्युत्तर पदवी शिक्षण वाणिज्य विभाग गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अभ्यासक्रम, शिक्षक, विदयार्थी आणि त्यांच्या पुढील आव्हाने याबद्दल अत्यंत उपयुक्त विचार आणि मार्गदर्शन डॉ तारे यांनी केले.याप्रसंगी बहुसंख्य पालक, विदयार्थी, शिक्षक, आणि प्राध्यापक मंडळी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ ईश्वर मोहुर्ले प्राचार्य यांनी तर संचालन प्रा. मोहन धुरतकर आणि आभार डॉ आशिष कावळे यांनी मानले.